बंद काळात दुकाने सुरू, पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:33+5:302021-03-31T04:36:33+5:30

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू केले होते. परिणामी, सर्व दुकाने ...

Shops open during the closed period, filing a crime with the police | बंद काळात दुकाने सुरू, पोलिसांत गुन्हा दाखल

बंद काळात दुकाने सुरू, पोलिसांत गुन्हा दाखल

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू केले होते. परिणामी, सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही नगावबारी परिसरातील प्रियदर्शनीनगरात विश्राम मोतीराम महाजन (७०) या वृद्धाने किराणा दुकान सुरू ठेवले होते. हा प्रकार सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास निदर्शनास आला. पोलीस कर्मचारी सुनील राठोड यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोलीस कर्मचारी सागर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोंदूर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलाजवळ अनिल शांताराम चौधरी (४७) यांनी आपले किराणा दुकान सुरू ठेवल्याचे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दिसून आले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Shops open during the closed period, filing a crime with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.