साक्री येथील मुख्य रस्त्यावरील दुकान चोरट्यांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:21 IST2019-04-10T16:20:24+5:302019-04-10T16:21:19+5:30

अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल, चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

The shop on the main street in Sakri was attacked by thieves | साक्री येथील मुख्य रस्त्यावरील दुकान चोरट्यांनी फोडले

साक्री येथील मुख्य रस्त्यावरील दुकान चोरट्यांनी फोडले

ठळक मुद्देअनिल पमनदास बुलाणी (रा. साक्री) यांचे सदाशिव जनरल स्टोअर्स आहे.चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला

आॅनलाइन लोकमत
धुळे : साक्री येथील मेन रोडवर असलेल्या एका दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व साबण, तेल असा एकूण २८ हजार ५०० रूपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री येथील मेन रोडवर अनिल पमनदास बुलाणी (रा. साक्री) यांचे सदाशिव जनरल स्टोअर्स आहे. ८ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील १३ हजार ५०० रूपये रोख व १५ हजार रूपये किंमतीचे कॉस्मेटीक्स, साबण, तेल असा एकूण २८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक के.एम. दामोदर करीत आहेत.

Web Title: The shop on the main street in Sakri was attacked by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.