शिवकेबल सेनेची बैठक संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:58+5:302021-02-14T04:33:58+5:30
अतिक्रमण हे अपघाताला आमंत्रण धुळे : शहरातील देवपूर परिसरात दत्तमंदिर चौक परिसरातील अतिक्रमण हे अपघाताला ...

शिवकेबल सेनेची बैठक संपन्न
अतिक्रमण हे अपघाताला आमंत्रण
धुळे : शहरातील देवपूर परिसरात दत्तमंदिर चौक परिसरातील अतिक्रमण हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. ते अवैध धंद्याचा अड्डा बनत चालेले आहे. भविष्यात हे त्रासदायक ठरणार आहे. प्रशासन झोपले आहे. लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सोमवारी धरणे
धुळे : जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. उपस्थितीचे आवाहन वसंत पाटील, ॲड. मदन परदेशी, प्रकाश भामरे, किशोर मिस्तरी, दशरथ भिल, सुधाकर पाटील, जगन पाटील, बाळकृष्ण साळुंखे, संजय पाटील यांनी केले आहे.
बायपासमुळे गावातील व्यवसायांवर परिणाम
कुसुंबा : नागपूर-सुरत महामार्गाचा बायपास सुरू झाल्यामुळे गावातील मोबाईल रिचार्ज, नाश्ता व चहा व्यावसायिकांच्या धंद्यावर याचा परिणाम झाला आहे. सर्व वाहने बायपासने जात असल्याने गावात गाड्या थांबत नाहीत.
ग्रामीण भागात गुटखा विक्री सुरू
दाेंडाईचा : गुटखा विक्रीला बंदी असतांनाही तालु्क्यातील ग्रामीण भाग तसेच पाड्यांवर गुटखा विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पाड्यांवर याची विक्री होत असून, यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
फरशी पुलावर पथदिवे लावावेत
धुळे : शहरातील कालिकामाता मंदिरापासून देवपूर भागाकडे जाण्यासाठी नागरिकांना फरशी पुलावरूनच जावे लागते. मात्र या पुलावर पथदिवे नसल्याने, रात्रीच्यावेळी अंधार असतो. पुलावर खड्डे पडलेले असल्याने, रात्रीच्यावेळी नदीपात्रात पडण्याची भीती असते. त्यामुळे या पुलावर पथदिवे बसवावेत अशी मागणी आहे.
वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी
धुळे : पारोळा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच खासगी वाहनेही याच रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी.
शिंदखेडा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक
चिमठाणे : ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा वाढलेली आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागात जाणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात येतात. वाहनांच्या बोनेटवरही प्रवासी बसवित असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
रुमालपाडा गावात मोफत ब्लँकेट वाटप
शिरपूर : येथील मुकेशभाई पटेल चॅरिटेेबल ट्रस्टच्यावतीने तालुक्यातील रुमालपाडा गावात नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, कृतिबेन भूपेशभाई पटेल यांनी आदिवासी भगिनी तसेच अनेक युवती, भगिनी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कृतिबेन पटेल यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप झाले.