शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र चित्र स्पर्धा, रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:35+5:302021-02-06T05:07:35+5:30

प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी हाेऊ शकतात. स्पर्धेत तीन गट आहेत. त्यात पहिली ते तिसरी, चाैथी ते ...

Shivcharitra painting competition, rally organized on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र चित्र स्पर्धा, रॅलीचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र चित्र स्पर्धा, रॅलीचे आयोजन

प्राथमिक व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी हाेऊ शकतात. स्पर्धेत तीन गट आहेत. त्यात पहिली ते तिसरी, चाैथी ते सहावी, सातवी ते दहावी असे गट आहेत. स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ फेब्रुवारी राेजी नाॅर्थ पाॅइंट स्कूल, विद्यानगरी येथे भरवण्यात येणार आहे. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे व प्रत्येक गटातून पाच गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. यंदा काेराेनामुळे शाळा सुरू नाहीत. त्यामुळे रंगभरण चित्र न देता विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर एक प्रसंग ११ बाय १५ इंच ड्राॅइंग पेपरवर चित्रित करून स्पर्धेसाठी सहभागी व्हायचे आहे. स्पर्धा शहरापुरतीच आहे. स्पर्धकांनी चित्र आपल्या कलाशिक्षक किंवा कला महाविद्यालयात ५ ते १२ फेब्रुवारी या काळात सकाळी साडेदहा ते दाेन या वेळेत एस.एस.व्ही.पी.एस. स्कूल ऑफ आर्ट येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी चेतन मराठे, अविनाश साेनवणे, नरेंद्र गव्हाणे, विवेक पाटील, कुंदन पाटील, प्रीती पाटील, भटू भामरे आदींशी संपर्क साधावा, असे प्राचार्य सुनील तांबे यांनी कळविले आहे.

Web Title: Shivcharitra painting competition, rally organized on the occasion of Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.