वर्गणी न घेता शिवजयंती साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:55+5:302021-02-12T04:33:55+5:30

धुळे- शिवजयंतीसाठी काेणत्याही प्रकारची देणगी, वर्गणी गाेळा न करता ढाेल-ताशांच्या निनादात उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी सर्वांनी ...

Shiva Jayanti will be celebrated without any subscription | वर्गणी न घेता शिवजयंती साजरी होणार

वर्गणी न घेता शिवजयंती साजरी होणार

धुळे- शिवजयंतीसाठी काेणत्याही प्रकारची देणगी, वर्गणी गाेळा न करता ढाेल-ताशांच्या निनादात उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केले.

शहरातील झालेल्या बैठकीत युवकांशी सुसंवाद साधताना अनुप अग्रवाल म्हणाले की, समस्त युवक शिवजयंती उत्सव समितीतर्फे यंदा जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हाेते. त्यांनी मुघलांच्या जुलमी राजवटीच्या जाचाला कंटाळलेल्या रयतेला दिलासा दिला. राज्याभिषेक करून घेऊन गनिमी काव्याने मुघलांशी युद्ध करून सळाे की पळाे करून साेडले. अफजल खान व शाहिस्तेखानसारख्या मुजोर सरदारांना वठणीवर आणले. यामुळे महाराजांचे जीवन युवकांना सतत प्रेरणा देत राहील. राजमाता जिजाऊंनी रामायण, महाभारत यांच्या कथांद्वारे महाराजांना घडविले. तसेच संस्कार प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना देऊन आदर्श पिढी घडवण्याची गरज असल्याचे महानगराध्यक्ष अग्रवाल यांनी सांगितले.

Web Title: Shiva Jayanti will be celebrated without any subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.