शिंदखेड्यात शिवसेनेचा जनता दरबार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:20+5:302021-09-25T04:39:20+5:30
शिवसेनेचा जनता दरबार लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी अनेकांनी केली होती. मात्र, कोरोना व शासनाच्या मार्गदर्शक नियमांमुळे जनता ...

शिंदखेड्यात शिवसेनेचा जनता दरबार सुरू
शिवसेनेचा जनता दरबार लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी अनेकांनी केली होती. मात्र, कोरोना व शासनाच्या मार्गदर्शक नियमांमुळे जनता दरबार सुरू करता आला नाही. आगामी काही दिवसात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर नियमितपणे जनता दरबार सुरु राहील, असे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, उपतालुकाप्रमुख चंद्रसिंग ठाकूर, तालुका समन्वयक विनायक पवार, ॲड. वसंत पवार, विभागप्रमुख नंदू दोरीक, दराणेचे मनोज पाटील, किशोर माळी, युवासेनेचे शहरप्रमुख योगेश माळी, प्रा. अनिल माळी, भटु अहिरे, गुलझारसिंग गिरासे, विनायक पाटील, नरेंद्र गिरासे, कमलेश पाटील, युवराज भामरे, संतोष पाटील आदी उपस्थित होते.