शिंदखेडा तालुक्यात ११ तर शिरपूरमध्ये तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:02+5:302021-01-19T04:37:02+5:30
शिंदखेडा तालुक्यात सातत्याने १५ वर्षांपासून भाजपचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये यंदा शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये पडावद, डाबलीदेवी, ...

शिंदखेडा तालुक्यात ११ तर शिरपूरमध्ये तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
शिंदखेडा तालुक्यात सातत्याने १५ वर्षांपासून भाजपचा दावा करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये यंदा शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये पडावद, डाबलीदेवी, महाळपूर, दसवेल जातोडा, अक्कडसे, खलाणे, डांगुर्णे, धावडे या ग्रामपंचायती, तर शिरपूर तालुक्यातील चाकडू, टेकवाडे, हिंगणी, पाडा या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिंदखेडा तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चौगाव, बेटावद दलवांडे, प्र.न. दरखेडा, दसवेल, सतमाने, जखाणे, हंबर्डे, जसाने लोहगाव, मुडावद, वरूळ, घुसरे, विरदेल ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी त्या माध्यमातून शिवसेनेने तालुक्यात एण्ट्री केली आहे. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शिरपूरचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, तालुकाप्रमुख गिरीश देसले, शिरपूर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.