देवपुरातील रस्ते दुरुस्तीच्या आश्वासनानंतर शिवसेनेने घेतले आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:25+5:302021-08-24T04:40:25+5:30
देवपुरातील २९ कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था शिवरायनगर, रामनगर, जानकीनगर, शाहूनगर, गीतानगर, श्रीराम कॉलनी, नवनाथनगर, उन्नतीनगर, तुळशीरामनगर, प्रमोदनगर, आनंदनगर, योगेश्वर कॉलनी, ...

देवपुरातील रस्ते दुरुस्तीच्या आश्वासनानंतर शिवसेनेने घेतले आंदोलन मागे
देवपुरातील २९ कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था
शिवरायनगर, रामनगर, जानकीनगर, शाहूनगर, गीतानगर, श्रीराम कॉलनी, नवनाथनगर, उन्नतीनगर, तुळशीरामनगर, प्रमोदनगर, आनंदनगर, योगेश्वर कॉलनी, एसआरपी कॉलनी, एकवीरानगर, संतोषी माता कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी, केलेनगर, शिवप्रताप कॉलनी, श्रीकृष्णनगर, रेणुकानगर, ओेमनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, सर्वेश्वरनगर, अभियंतानगर तसेच शिवाजीनगर या भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाची शंभर टक्के वसुली होत असताना मनपाकडून मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाकडून शहराची वाट लावली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. या वेळी महापालिकेच्या प्रवेशव्दाराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रस्त्यांच्या कामाबाबत जोपर्यंत आयुक्तांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. या वेळी अभियंता कैलास शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क अतुल सोनवणे, महानगरप्रमुख पाटील, महानगरप्रमुख मनोज मोरे, पंकज गोरे, किरण जोंधळे, गुलाब माळी, नंदू फुलपगारे, संजय वाल्हे, ललित माळी, मच्छिंद्र निकम, प्रवीण साळवे आदी सहभागी झाले होते.
भजन आंदोलन मागे घेण्याची विनंती
शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ललीत माळी यांनी देवपुरातील रस्ते दुरुस्ती करा अन्यथा मंगळवारी आयुक्तांच्या घरासमोर भजन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. सोमवारी शिवसेनेच्या आंदोलनस्थळी अभियंता कैलास शिंदे यांनी आंदोलकांना पंधरा दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने ललीत माळी यांचे आंदोलन तूर्तास स्थगित झाले आहे.