देवपुरातील अजयनगर, डिगंबर पाडवी साेसायटी परिसरात हे आंदाेलन झाले. त्यात शिवसेनेचे महानगरप्रमुख मनाेज माेरे, प्रफुल्ल पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जाेंधळे, उपमहानगरप्रमुख ललित माळी, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख हरीश माळी, माजी नगरसेवक संजय वाल्हे, दिनेश पाटील, आर.एच. पाटील, एच.ए. पाटील, अनिल पाटील, नाना वाघ, श्याम गाेयल, पी.आर. पाटील, आर.बी. पाटील, संदीप माळी, प्रबाेधन माेरे, जितेंद्र पवार, भिकन माेरे, सिद्धेश नाशिककर, संदीप राेकडे, शरद साेंजे, चंद्रशेखर पवार, मधुकर बैसाणे, अक्षय माेरे आदी सहभागी झाले. देवपुरात रस्ते दुरुस्तीचा देखावा करून लाखो रुपयांची बिले मंजूर केली. मनपा व सत्ताधारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केेले जाते. खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत. रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. सत्ताधाऱ्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष होते आहे. आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शिवसेनेतर्फे आंदाेलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
चिखल तुडवत शिवसेनेने केला मनपाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST