शिवसेना, राष्ट्रवादीतर्फे व्यंकय्या नायडूंचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:34 IST2020-07-23T21:34:22+5:302020-07-23T21:34:41+5:30
शिवरायांच्या जयघोषाला विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, उपराष्ट्रपतींना पत्रही पाठविले

dhule
धुळे : उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वागणुकीचा महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसने तीव्र शब्दात निषेध केला आहे़
शिवसेनेतर्फे गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ व्यकंय्या नायडू यांनी शिवाजी महाराजांच्या जयघोषाला विरोध करुन एक प्रकारे त्यांचा अवमान केल्याने भावना दुखावल्या आहेत़ त्यामुळे व्यंकय्या नायडूंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत त्यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे़
असा प्रकार भविष्यात खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा असे वक्तव्य केल्यास भाजप नेत्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, युवा सेनेचे पंकज गोरे, आधार हाके, उपतालुकाप्रमुख सुदर्शन पाटील, देवराम माळी, संदीप सूर्यवंशी, राजेश पटवारी, प्रफुल्ल पाटील ,संदीप चव्हाण, राजेश पाटील, केशव माळी, अमृत पाटील यांनी दिला आहे़
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील व्यंकय्या नायडूंच्या वर्तणुकीचा जाहिर निषेध केला आहे़ पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, निलेश चौधरी, राजदिप काकडे, एजाज शेख, रवी कोरे, निखील मोमाया, चंद्रशेखर भदाणे, अरविंद पाटील आदींनी गुरूवारी मुख्य टपाल कार्यालयातून व्यंकय्या नायडू यांना शिवरायांच्या जयघोषाचे पत्र पाठविले़ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली़
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला़ यावेळी सभापती व्यंकय्या नायडून यांनी शिवरायांच्या घोषणेला विरोध केला़ ज्या छत्रपतींच्या नावाने भारतीय जनता पार्टी राजकारण करते, ज्या छत्रपतींमुळे हिंदूत्व व मंदिरे टिकून राहिली, त्या छत्रपतींच्या घोषणेला विरोध का? असा प्रश्न उपस्थित करीत, शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय भाजपचे राजकारण पूर्ण होत नाही़ असे असताना त्यांच्या नावाच्या जयघोषाला विरोध करणाºया भाजपच्या नेत्यांचा जाहिर निषेध करतो, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे़
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तीव्र भावना व्यक्त केल्या़