डॉ. जितेंद्र ठाकूर म्हणाले, शिरपूर तालुक्यातील सहकारी प्रकल्प आजमितीस बंद अवस्थेत पडले आहेत. बंदमुळे शेतकऱ्यांसह रोजगार व कामगारांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून हा कारखाना बंद पडला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा राहिला पाहिजे, सुरू केला पाहिजे याचा प्रयत्न या समितीतर्फे केला जाणार आहे.
विद्यमान संचालक मंडळ गेल्या चार वर्षांपासून निवडून आलेले आहेत. त्या संचालक मंडळाने एक वचन निवडणुकीच्या वेळी दिले होते की, निवडून आल्याबरोबर एक ते दीड वर्षांच्या आत कारखाना सुरू केला जाईल. परंतु या संचालक मंडळाला आता चार वर्षे होत आले तरी सुद्धा कारखाना सुरू करण्यासाठी पुढे सरसावलेले नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी बँकेला निवदेन देऊन कारखाना सुरू करा, जर सुरू होत नसेल तर भाडेतत्त्वावर द्या. आज महाराष्ट्रामधील बरेचशे कारखाने भाडेतत्त्वावर सुरू आहेत. बँकेला सूचित करूनही बँकेने भाडेतत्त्वावर हा कारखाना दिला नाही. बँकेने या संदर्भात कारखाना प्रशासनाला भाडेतत्त्वावर देण्या संदर्भात पत्र पाठविले आहे. तरी त्या निर्णयावर संचालक मंडळाने कुठलेही मिटिंग न घेतली नाही. भाडेतत्त्वावर संचालक मंडळाने निर्णय घेतल्यास बँकदेखील एक पाऊस मागे घेणार होते. परंतु असा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील संचालक मंडळ घेऊ शकले नाही. नाईलाजाने लवकरच शेतकरी सभासदांची मिटिंग बोलवावी लागेल, असेही डॉ. ठाकूर यांनी जाहीर केले.