धुळे : शिरपूर शहरातील मांडळ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी एका तरुणाला मोटारसायकलीवरुन गुटखा, पानमसाला अवैधपणे वाहून नेताना रंगेहात पकडले़ ही कारवाई गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांनी केली़शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील पिंटू शर्मा हा मांडळ गावाच्या प्रवेशद्वारासमोर एका विनाक्रमांकाच्या मोटारसायकलीवरुन राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधपणे घेऊन जात असताना मिळून आला़ त्याच्याकडून ३० हजाराची मोटारसायकल, विमल पान मसाला गुटखा असा एकूण ५९ हजार २३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी पिंटू शर्मा या संशयिताविरुध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
शिरपुरात तरुणाला गुटख्यासह पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:12 IST