फुटबॉल स्पर्धेत शिरपूर संघाला अव्वल स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:54 IST2018-11-26T22:50:53+5:302018-11-26T22:54:43+5:30

आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर संपन्न

Shirpur team tops in football tournament | फुटबॉल स्पर्धेत शिरपूर संघाला अव्वल स्थान

फुटबॉल स्पर्धेत शिरपूर संघाला अव्वल स्थान

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या फुटबॉल संघाने १५ वर्षे वयोगटात स्कूल स्पोर्ट प्रमोशन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित फुटबॉल स्पर्धेत एकूण ३ संघांना नमवून अव्वल स्थान पटकावले.
आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर संपन्न झालेल्या स्कूल स्पोर्ट प्रमोशन फाऊंडेशनच्या फुटबॉल सामन्यात खेळाडू प्रसाद शितोळे, स्पर्श ठाकूर, नमन पाटील, नीरज गेहलोत, आयुष परीहार, जयदीप पाटील, पंकज पाटील, सर्वेश राणे, पंकज पाटील, सुशील पवार, मानस पाटील, ओम पाटील, साई रेड्डी, मित पटेल, तुषार पाटील, प्रमोद क्षिरसागर, आदित्य लचेटा, प्रफुल चव्हाण यांनी उत्तम कामगिरी बजावल्याने स्कूलचा फुटबॉल संघ अव्वल ठरला. खेळाडूंच्या यशाबद्दल  माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, तपनभाई पटेल, राहुल दंदे, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, डॉ.उमेश शर्मा, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर यांनी कौतुक केले.  यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूल क्रीडा समन्वयक पूजा जैन, फुटबाल कोच मोहमद शफिक, क्रीडा शिक्षक सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Shirpur team tops in football tournament

टॅग्स :Dhuleधुळे