शिरपूर तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी प्रशासनाची साथ हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:46 IST2020-12-19T21:46:10+5:302020-12-19T21:46:54+5:30
प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच

dhule
सुनील सांळूखे
प्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसनमुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही. या संदर्भात यापूर्वी गाव पुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत. मात्र प्रशासनाने देखील साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़ प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच गाव व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार काशिराम पवार यांनी व्यक्त केले.
प्रश्न : शिरपूर तालुक्यात दारू, गांजाची शेती केली जाते, त्या संदर्भात काय सांगाल?
उत्तर : वनजमिनीवर गांजाची शेती होत असेल तर सर्वप्रथम वनविभागाने लक्ष दिले गेले पाहिजे़ मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गांजाची शेती होत आहे़ पोलिस कारवाईत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, त्याप्रमाणे त्या भागातील संबंधित वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात देखील कारवाई झाली तर निश्चितच गांजाची शेती कुणी करणार नाही़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ तसेच प्रशासनानेही कानाडोळा करू नये़
प्रश्न : दारू व गांजामुळे ग्रामीण
भागात काय परिणाम होतो ?
उत्तर : बनावट दारूत स्पिरीटचा अधिक वापर केला जात असल्यास ती शरीराला हानीकारक आहे़ २० ते ४० वयोगटातील तरूणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन झाली आहे़ त्यामुळेच शरीर काही दिवसांनी पोकळ व्हायला सुरूवात होते़ तो दुसरे कोणतेच काम करीत नाही़ त्यांचे सर्व आयुष्य दारू पिण्यातच जाते अशी परिस्थिती आहे़ कदाचित त्याचे लग्न झाले असेल तर संसार देखील उध्दवस्त होत आहे.
प्रश्न : तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी आपण काय उपाय योजना करीत आहेत ?
उत्तर : प्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसन मुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ या संदर्भात यापूर्वी गावपुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत़ मात्र प्रशासनानेही साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़.
प्रश्न : व्यवसनाधिनतेचा तालुक्यावर काय परिणाम होत आहे. ?
उत्तर : काही वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात २० ते ४० वयोगटातील तरूण दारूमुळे किती मरण पावतात, त्यावेळी एका ग्रामपंचायत हद्दीत ५० जण मरण पावत असल्याचे उघड झाले होते़ सांगवी, कोडीद, बोराडी भागात शंभरावर मरण पावल्याचे निर्देशनास आले़ लग्न झालेल्यामुळे त्या भागातील त्या महिला देखील विधवा झाल्यात़ आहेत.
भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?
खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.
भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?
खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.