शिरपूरला २७ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:53 IST2019-09-10T12:52:16+5:302019-09-10T12:53:03+5:30

कारवाई : गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु

Shirpur Gutkas worth Rs | शिरपूरला २७ लाखांचा गुटखा पकडला

शिरपूरला २७ लाखांचा गुटखा पकडला

धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी ट्रकसह २७ लाखांचा गुटखा जप्त केला आहे़ एका ट्रकच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती़ त्यानुसार मंगळवारी सकाळी सापळा लावण्यात आला़ ट्रक येताच त्याला अडविण्यात आले़ तपासणी केली असता त्यात गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या आहेत़ ट्रकसह २७ लाखांचा गुटखा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे़ गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़ 

Web Title: Shirpur Gutkas worth Rs