दुचाकीच्या धडकेत शिरसमणीची महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:26+5:302021-05-13T04:36:26+5:30
धुळे : भरधाव वेगातील मोटारसायकलने पुढे धावणाऱ्या दुसऱ्या एका मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने आशाबाई बापू ठाकरे (२३, रा. ...

दुचाकीच्या धडकेत शिरसमणीची महिला ठार
धुळे : भरधाव वेगातील मोटारसायकलने पुढे धावणाऱ्या दुसऱ्या एका मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने आशाबाई बापू ठाकरे (२३, रा. शिरसमणी, ता. पारोळा) ही महिला जागीच ठार झाली.
कुंडाणे, ता. धुळे शिवारात वेल्हाणे-कुंडाणे रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मयत आशाबाई ठाकरे ही महिला एम. एच. १९/३१५२ क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसली होती. मागून भरधाव वेगाने मोटारसायकलवरून येणाऱ्या आनंद उत्तम पवार (रा. फागणे, ता. धुळे) याने जोरदार धडक दिली. यात आशाबाई जागीच ठार झाली.
याप्रकरणी रामकृष्ण भावराव सोनवणे (३५, रा. बोरविहीर, ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद उत्तम पवार याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. पी. चाैधरी करीत आहेत.