शिरपूरला दोन गटात वादानंतर दगडफेकीने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 12:36 IST2018-10-08T12:34:34+5:302018-10-08T12:36:20+5:30

परस्पर विरोधी फिर्याद : ६ जणांना केले जेरबंद

Shirapur gets stuck in two groups after tension | शिरपूरला दोन गटात वादानंतर दगडफेकीने तणाव

शिरपूरला दोन गटात वादानंतर दगडफेकीने तणाव

ठळक मुद्देशिरपुरात दोन गटात वाददगडफेकीने वाढला तणाव६ जण अटकेत, ४ ते५ जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूर येथील किस्मतनगर भागात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले़ तणाव निर्माण झाल्याने दोन्ही गट एकमेकांवर चालून आल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला़ ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली़ घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ धुळ्यातूनही पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले़ पोलिसांनी समदअली सैय्यदअली, आकाश संजय चौधरी, राहुल रतिलाल सुतार, राहुल अशोक चौधरी, मुस्तफा उर्फ भुºया शहा गफ्फ ार शहा, रज्जाक अली सय्यद अली या सहा संशयितांना अटक करण्यात आली़ तर या घटनेत ४ ते ५ जणांना दुखापत झाली़ ज्या भागात वाद निर्माण झाला होता त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शिरपुरात तणावपूर्ण शांतता आहे़ 

Web Title: Shirapur gets stuck in two groups after tension