शिंदखेडा :शेतकरी परराज्यातून मागवित आहेत कापसाचे संकरीत बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:16 IST2019-05-16T21:14:37+5:302019-05-16T21:16:51+5:30

शासनाकडून वाण उपलब्ध नसल्याने कृषी विक्रेत्यांचे नुकसान

Shindkheda: The farmers are demanding from the state under the hybrid seeds of cotton | शिंदखेडा :शेतकरी परराज्यातून मागवित आहेत कापसाचे संकरीत बियाणे

dhule

शिंदखेडा : शहर आणि परिसरातील कृषी सेवा केंद्रातील विक्रेत्यांना महाराष्ट्र शासनाने कापसाचे संकरित वाण उपलब्ध न करून दिल्याने या व्यापाºयांचे अतोनात नुकसान होत आहे. १० मे पासूनच शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी परराज्यात स्वत: जाऊन बीटी बियाणे विकत आणत आहेत. शेतकरी रोखीने बाहेर जाऊन बियाणे आणत असल्याने स्थानिक विक्रेत्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यामधील शेतकºयांना एक जूनपूर्वी बीटी कापूस लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. यासाठी कृषी खात्याने विक्रेत्यांना बियाणे उपलब्ध करून दिलेले नाही, तसेच जर कुणी बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे तालुक्यातील तापी परिसर आणि काही ठराविक पाण्याची उपलब्धता असणाºया गावातील शेतकºयांनी कापूस बियाणे लागवडीची तयारी चालवली आहे. हे बियाणे आपल्या विक्रेत्याकडे उपलब्ध नसल्याने शेजारील मध्यप्रदेशातील सेंधवा, खेतिया, पानसेमल, तसेच गुजरातमधील निझर, कुकरमुंडा, वेलदा, सुरत आदी ठिकाणाहून बियाणे खरेदी करण्याचा सपाटा शेतकºयांनी लावला आहे. केवळ बियाणे उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बियाणे विक्रेत्यांची कुचंबणा होत आहे. यात विशेष धोका म्हणजे बियाणे रोखीने आणताना शेतकºयांच्या हाती असलेला पैसा संपून गेल्यास पुढे खते, औषधासाठी स्थानिक विक्रेत्याकडे उधारीचा व्यवहार असणार आहे. त्यासाठी त्यांना हे अडचणीचे ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विक्रेत्यांनाच अडचणीत आणणाºया या निर्णयाबद्दल विक्रेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Web Title: Shindkheda: The farmers are demanding from the state under the hybrid seeds of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे