दोंडाईचा येथे आज शरद पवार यांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:03+5:302021-02-17T04:43:03+5:30
दोंडाईचा : दोंडाईचा येथे १७ फेब्रुवारी रोजी नूतन हायस्कूलच्या अप्पासाहेब मैदानावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ...

दोंडाईचा येथे आज शरद पवार यांची सभा
दोंडाईचा : दोंडाईचा येथे १७ फेब्रुवारी रोजी नूतन हायस्कूलच्या अप्पासाहेब मैदानावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. जाहीर सभेतच माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गाेटे यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात२६ जानेवारीपासून शिंदखेडा मतदारसंघ दहशत व भयमुक्त अभियान सुरू केले आहे. अभियानाचा समारोप १७ फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथे होणार आहे. समारोपाप्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सकाळी पुणे येथून ओझर विमानतळावर येतील. तेथून ते हॅलिकॉप्टरने सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान दोंडाईचा येथे पाेहोचतील. हेलिपॅडवरून ते सरळ सभास्थानी येतील. दुपारी सभा आटोपून भोजनानंतर दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने नाशिककडे रवाना होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली.
डॉ. हेमंत देशमुखांचा प्रवेश
जाहीर सभेतच माजी मंत्री व ज्येष्ठ नेते डाॅ. हेमंत देशमुख हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यासाठीच कोरोना काळानंतर प्रथमच डाॅ. हेमंत देशमुख सोमवारी (दि. १५) दोंडाईचात परतले आहेत. डॉ. देशमुख यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुखांसह माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी आधीच गोटेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे.