धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: June 25, 2017 17:45 IST2017-06-25T17:45:47+5:302017-06-25T17:45:47+5:30

गरोदर राहिल्याने फुटली वाचा, तिघांविरूघ्द गुन्हा

Sexual harassment on a minor girl by showing bait for Dhule | धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धुळ्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आॅनलाईन लोकमत 

धुळे,दि.२५ - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चितोड रोड परिसरातील राऊळवाडीत उघडकीस आली आहे़ त्यातून मुलगी गरोदर राहिल्याने घटनेला वाचा फुटली़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द बलात्काराचा व सहाय्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सतीश विजू इंगोले (रा.राऊळवाडी, चितोड रोड धुळे) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. आणि तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले़ गेल्या २ वर्षांपासून त्याने त्याच्या घरात बोलवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले़ तर शरद इंगोले, राजू इंगोले (पूर्ण नाव , गाव माहिती नाही) या दोघांनी त्याच्या घरावर पहारा ठेवून त्याला सहकार्य केले़ शरीरसंबंधातून ही  मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली. तिला उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ पीडित मुलीने रविवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सतीश इंगोले, शरद इंगोले व राजू इंगोले या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sexual harassment on a minor girl by showing bait for Dhule