सात अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:34 IST2021-02-01T12:34:16+5:302021-02-01T12:34:28+5:30
धुळे : खाजगी प्रयोगशाळेतील सात अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे शहरातील पाच जणांचा समावेश आहे. तसेच वरखेडी व ...

सात अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
धुळे : खाजगी प्रयोगशाळेतील सात अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे शहरातील पाच जणांचा समावेश आहे. तसेच वरखेडी व शिंदखेडा येथील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८२६ इतकी झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळा रविवारी बंद
सध्या कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रविवारी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रयोगशाळा बंद ठेवण्यात येत आहे. प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेची कामे रविवारी होत असल्यामुळे कोरोना चाचण्यांची तपासणी होत नाही. त्यामुळे केवळ खाजगी प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त होतात. जिल्ह्यातील दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता त्यावेळी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत २४ तास स्वाब तपासण्याचे काम सुरु राहायचे. सुरुवातीला धुळे जिल्ह्यासोबतच जळगाव, नंदुरबार व मालेगाव येथील रुग्णांच्या स्वबची तपासणी या प्रयोगशाळेत होत असे.
तंत्रज्ञांची कमतरता - हिरे महाविद्यालयातील प्रयोगशाळेत सध्या दररोज सरासरी २०० स्वबची तपासणी होत आहे. त्या तुलनेत लागणारे मनुष्यबळ मात्र कमी असल्याचे प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ.माधुरी सूर्यवंशी यांनी सांगितले. प्रयोगशाळेत १० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ३ प्राध्यापक, ५ तंत्रज्ञ व २ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण आढळण्याची प्रमाण जास्त होते तेव्हा इतर विभागातील तंत्रज्ञांची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले.