तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी धुळे, शिरपूर आगारातून स्वतंत्र बसेस सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:29 IST2021-01-09T04:29:50+5:302021-01-09T04:29:50+5:30
या योजनेंतर्गत धुळे आगारातून दर रविवारी शेगाव तीर्थक्षेत्रासाठी सकाळी ६.३० वाजता बस सोडण्यात येईल. ही बस रात्री ९.३० वाजता ...

तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी धुळे, शिरपूर आगारातून स्वतंत्र बसेस सोडणार
या योजनेंतर्गत धुळे आगारातून दर रविवारी शेगाव तीर्थक्षेत्रासाठी सकाळी ६.३० वाजता बस सोडण्यात येईल. ही बस रात्री ९.३० वाजता धुळ्यात परत येईल. तर पर्यटकांसाठी दर रविवारी धुळ्याहून घृष्णेश्वर, वेरूळ लेणी, भद्रा मारुती, दौलताबाद दर्शनासाठी बस सोडण्यात येणार आहे. ही बस सकाळी ६ वाजता सुटून रात्री ९ वाजता धुळ्यात परतेल.
तसेच शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी धुळे आगारातून औरंगाबाद, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर, पैठण, जायकवाडी या पर्यटन क्षेत्रासाठी सकाळी ६ वाजता बस सोडण्यात येईल. ही बस रात्री ९ वाजता धुळ्यात परतेल. तसेच शिरपूर आगारातून नांदुरीगड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसाठी बस सोडण्यात येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ ९ व १० जानेवारीपासून होत आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ व विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.