सांगवीनजिक ट्रक चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:17 IST2018-12-03T12:15:23+5:302018-12-03T12:17:24+5:30

मुंबई-आग्रा महामार्ग : धारदार चाकूने केला वार 

Sensational truck driver's murder | सांगवीनजिक ट्रक चालकाचा खून

सांगवीनजिक ट्रक चालकाचा खून

ठळक मुद्देसुळे फाटा जवळ ट्रकचालकाचा खूनपहाटेचा थरार, पोलीस दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर  : मुंबई आग्रा महामागावरील सांगवीनजिक सुळे फाट्यावर सोमवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ट्रक चालक, चालकाचा भाऊ व सहचालक जेवणासाठी थांबलेत. मात्र चालक निहाज अहमद वाजीड अली (५५ रा. गंगावली जि. संतकबीर नगर, यूपी) हा गाडीत झोपला होता. त्यामुळे चालकाचा भाऊ व सह चालक हे दोघे जेवणासाठी गेले. दरम्यान, कोणीतरी झोपेत असलेला चालकाला धारदार चाकूने वार करून जागीच ठार केले. घटनास्थळी यूपी ५१ एटी २२९९ क्रमांकाचा ट्रक उभा आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी भेट देवून तपासणी करीत आहेत. या वेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी देखील भेट दिली. ट्रक शिरपूर कडून इंदूरकडे जात होता़ 

Web Title: Sensational truck driver's murder