मुलींच्या संघाची क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:28 IST2018-11-25T21:28:07+5:302018-11-25T21:28:49+5:30

शिरपूर येथील संघ : जिल्हास्तरीय किक्रेट स्पर्धेत १७ वर्षीय संघाचा सहभाग 

Selection for girls' team cricket | मुलींच्या संघाची क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

मुलींच्या संघाची क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुलींच्या संघाने १७ वर्षीय वयोगटातील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत  यश संपादन केले असून त्यांनी विभागीय स्पर्धेसाठी मजल मारली आहे.
शहरातील आर.सी.पटेल फार्मसी मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेत  १७ वर्षे वयोगटात मुकेशभाई पटेल सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुलींच्या संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल्याने त्यांची विभागीयस्तरावर निवड झाली आहे. क्रिकेटच्या या संघात हर्षिता कोळी, भाग्यश्री चौधरी, श्रेया परमार, दिक्षिता हुरेज, किनाली शहा, वैष्णवी कुलकर्णी, प्रतीक्षा सोमाणी, हेताली बाविस्कर, पिंकल अग्रवाल, प्राची बच्छाव, रश्मी पवार, नुपूर पटेल, गायत्री पाटील, यशस्वी पारख, भूमिका पटेल व दिव्यंका यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या यशाबद्दल   आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, मुख्य लेखापाल व प्रशासकीय अधिकारी राहुल दंदे, क्रीडा प्रमुख प्रितेश पटेल, मुख्याध्यापिका पूनम ठाकूर यांनी कौतुक केले. याकामी क्रिकेट कोच पूजा जैन, क्रीडा शिक्षक डी.बी.माळी, सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection for girls' team cricket

टॅग्स :Dhuleधुळे