शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

धुळे शहरात कोरोनाचा दुसरा बळी, जिल्ह्यात मृतांची संख्या झाली तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:05 IST

एकाच दिवशी सात रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

आॅनलाईन लोकमतधुळे : धुळे शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या वडजाई रोड परिसरातील कोरोना बाधित ४५ वर्षीय रूग्णाचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. कोरोनामुळे धुळे शहरात आतापर्यंत दोन तर जिल्ह्यात एकूण तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान जिल्ह्यात एकाच दिवशी सात रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे.धुळे शहरातील वडजाई रोडवरील गजानन कॉलनी परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचे २० एप्रिल रोजी कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वी साक्री येथील ५३ वर्षीय व धुळ्यातील मच्छिबाजार परिसरातील ५७ वर्षीय प्रौढाचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.एकाच दिवशी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्हजिल्ह्यात एकाच दिवशी सात नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात धुळे शहरातील सहा व शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता १५वर पोहचली आहे.शहरातील मच्छिबाजार परिसरातील ज्या कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला होता, त्याच्या परिवारातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे