शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगार वाहनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:37 PM

विदारक चित्र। वाहने मोकळ्या श्वासाच्या प्रतिक्षेत, मार्ग काढण्याची गरज

देवेंद्र पाठक ।धुळे : पोलीस ठाण्यांच्या आवारात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा भरणा वाढत असून प्रयत्न करुनही ते कमी होतांना दिसत नाही़ वेगवेगळ्या पध्दतीने जमा होणाऱ्या वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे़ परिणामी चांगल्या प्रकारची वाहने देखील भंगार होण्याच्या मार्गावर आली आहेत़ या सर्व पडून असलेल्या वाहनांचा प्रशासकीय पातळीवरुन लिलाव केल्यास त्याच्यातून मिळणाºया रकमेचा शासनाच्या गृह विभागाला निश्चित फायदा होऊ शकतो़जिल्ह्यासह शहरातील पोलीस ठाण्यांचा आवार भंगार वाहनांनी व्यापलेला दिसतो़ वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या या वाहनांनी पोलीस ठाण्याचे आवार वेढले आहे़ काही ठिकाणी तर जागाच उरली नसल्याने वाहनांवर वाहन ठेऊन चहुबाजुंनी इमले बांधले जात आहे़ पोलिसांकडून जप्त होणारी वाहने, चोरट्यांकडून हस्तगत केली जाणारी वाहने जमा होत असताना कागदपत्रांअभावी अशा वाहनांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्यांचा आवार कितीही स्वच्छ केला तरी येथे गलिच्छता पसरलेली दिसते़ वर्षानुवर्ष पडलेली वाहने धुळीने माखली आहेत़ अशा वाहनांवर झाडांचा पालापाचोळा साठलेला दिसतो़ परिणामी या भागात घाणीचे साम्राज्य पसलेले आहे़ पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचा निपटारा वेळीच करण्याची गरज आहे़ जिल्ह्यात, शहरातच नाही तर ही स्थिती राज्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या आवारात कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे़ पोलीस ठाण्याच्या आवारातील भंगार पडलेल्या वाहनांची माहिती संकलित करण्याचे काम पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी हाती घेतले होते़ आवार निश्चितच स्वच्छ होण्यास मदत होईल़ महसूलचा विनियोग करता येईल, एवढंच!आता ही वाहने ठेवायची कुठे?पोलीस ठाण्याच्या आवारात जमा होणाºया वाहनांची संख्या लक्षात घेता नव्याने जमा होणाºया वाहनांमुळे आता ही सर्व वाहने ठेवायची कुठे? असा प्रश्न संबंधित पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांपुढे निर्माण होणे स्वाभाविक आहे़ यामुळे हा प्रश्न आता संपुष्टात आणण्यासाठी पोलीसअधीक्षकांनी निर्णय घ्यायला हवा़वाहन लिलावातून गृह विभागाला मिळू शकतो महसूलन्यायालय, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित येऊन अशा वाहनांसंदर्भात समर्पक तोडगा काढण्याची आवश्यकता आहे़ कोणते वाहन पोलीस ठाण्यांच्या आवारात कोणत्या कारणामुळे उभे आहे याची माहिती संकलित करुन त्या सर्व वाहनांचा लिलाव केल्यास मिळणाºया रकमेतून लाभ मिळविता येईल़ सध्यस्थितीत शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या आवारात जमा होत असलेल्या वाहनांची संख्या एकत्रित लक्षात घेतल्यास ती हजारोच्या संख्येत निश्चित असेल़ यात दुचाकी, तीन चाकीसह चार चाकी वाहनांसह काही ठिकाणी तर मोठे ट्रकदेखील आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे