विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा सुरू कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:16+5:302021-06-19T04:24:16+5:30
विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना दुसरीकडे मुख्याध्यापक, शिक्षक नियमित शाळेत जात राहिले आहेत. मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटल्याने, ...

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा सुरू कराव्यात
विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतांना दुसरीकडे मुख्याध्यापक, शिक्षक नियमित शाळेत जात राहिले आहेत.
मागील दीड वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटल्याने, बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले आहेत. संपूर्णत: सैरभैर झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने शाळेच्या प्रवाहात आणणे अत्यंत जिकिरीचे असून, हे काम सर्वांनी प्राधान्याने आणि कर्तव्यभावनेने करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण, दुर्गम भागातील तसेच सर्वसामान्यांचे पाल्य, विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शिकूच शकत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी समितीचे पदाधिकारी प्रभाकर रायते, सुरेश पाटील एकनाथ भामरे, आनंद पाटील, अनिल नहिरे, अनिल सोनवणे, प्रमोद सोनवणे, श्रीकृष्ण साबळे, सुनील सोंजे, गोपाल लोहार, संदीप पाटील उपस्थित होते.