धुळे जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:53 IST2020-03-02T11:53:02+5:302020-03-02T11:53:22+5:30
शाळेच्या वेळेत अर्धातासाने बदल

धुळे जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरूवात
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्ह्यात होळीपूर्वीच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार २ मार्च ते ३० एप्रिल २०२० या कालावधीत सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत. दरम्यान शाळांची वेळ अर्धातासाने कमी करण्यात आलेली आहे.
शिक्षण विभागाच्या ४ जून २०१९च्या पत्रानुसार २ मार्च २०२० पासून शाळेची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी १-१० अशी करण्यात आलेली होती. मात्र उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे व पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी मनिष पवार यांना पटवून दिले. शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ४ जूनचे १९ चे सुट्यांचे परिपत्रकात दुरुस्ती करून नवीन पत्र काढले. त्यानुसार २ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळ सत्रात ७ ते दुपारी १२.२० या वेळेत भरतील असे आदेश पारीत केले. शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल जिल्हा अध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील, समन्वय समितीचे सदस्य रवींद्र खैरनार, गमन पाटील , नविनचंद्र भदाणे,शरद पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, प्रवीण भदाणे,चंद्रकांत सत्तेसा सुरेंद्र पिंपळे, विजय पाटील, योगेश धात्रक, राजेंद्र भामरे, अनिल तोरवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, हारून अन्सारी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.