शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

३० एप्रिलपर्यंत शाळा बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या पाहता, जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ...

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या पाहता, जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, कंटेन्मेंट झोन वगळता आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली होती. यामुळे विद्यार्थी नसले तरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड शाळेत जावेच लागत होते. याकडे शिक्षक संघटनांनीही शिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने १८ एप्रिलपासून रात्री ८ ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे सुधारित आदेश काढून ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा बंद राहतील. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संचारबंदी काळात शाळेत येण्याची आवश्यकता नाही, म्हणजे त्यांनाही सुटी देण्यात आल्याचे पत्रक काढले आहे. शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दरम्यान, सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे लसीकरण करून घ्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षक संघटनांनी केली शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

संचारबंदीच्या काळात शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याबाबत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने एका निवेदनाद्वारे केली होती. यात कर्मचाऱ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसावी, असा आदेश काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील व जिल्हा सरचिटणीस बापू पारधी यांची स्वाक्षरी आहे.

तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे यांनीही प्राथमिक शिक्षणाधिकारी पवार यांच्याशी चर्चा करून सुटी देण्याची मागणी केली होती.

या दोन्ही शिक्षक संघटनांच्या मागणीचा विचार करून शिक्षणाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत शाळा बंदचे आदेश काढले आहेत.