शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:33+5:302021-09-11T04:37:33+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर राज्य शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांची ...

शाळेची घंटा वाजली, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर राज्य शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती असते. शाळा सुरू झाल्यापासून एकाही विद्यार्थ्याला अथवा शिक्षकाला कोरोनाची लागण झालेली नाही.
दरम्यान, प्राथमिकच्या शाळा १७ ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. परंतु तो मुहूर्त हुकला आहे. असे असले तरी पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी शाळेच्या ओट्यावर बसविले जात आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू झालेल्या नाहीत.
माध्यमिकमध्ये विद्यार्थी
n ग्रामीण भागात माध्यमिकच्या शाळा सुरू झालेल्या आहेत.
n जिल्ह्यात ३५० शाळा सुरू असून, त्यात धुळे तालुक्यात १२३, साक्रीत ९५, शिरपूर ५७ व शिंदखेडा तालुक्यात ७५ शाळांचा समावेश आहे.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शाळा सुरू झाल्या तेव्हा सर्वच वर्ग खोल्यांचे सॅनिटराईज करण्यात आले होते. मात्र आता ते करण्यात येत नाही. सॅनिटायझरचा खर्च करायचा कोणी, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याबाबत आदेश नाही
ग्रामीण भागात माध्यमिकच्या शाळा सुरू झालेल्या असल्या तरी पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त नाही. विद्यार्थ्यांचे ॲानलाइन शिक्षण सुरू आहे.