चितळे शाळेच्या पाच छात्रसैनिकांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 21:02 IST2020-07-26T21:02:19+5:302020-07-26T21:02:35+5:30
गौरव : प्रत्येकी हजाराचे पारितोषिक

dhule
धुळे : येथील देवपूरातील धुळे एज्युकेशन सोसायटीचे रा़ के़ चितळे माध्यमिक विद्यालयाचे पाच छात्रसैनिक महाराष्ट्र शासनाची एनसीसी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत़ या शिष्यवृत्तीमध्ये न्यू सिटी शाळेच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे़
रोहित हिरालाल माळी, पवन पुनमचंद सूर्यवंशी, रोहित सुरेश झाल्टे, वैभव संजय नाथजोगी, विकास भरतसिंग वळवी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत़ शाळेत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक आमोद गंगाधर जोग यांच्या हस्ते त्यांना शिष्यवृत्तीचा प्रत्येकी हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला़
यावेळी न्यू सीटीचे मुख्याध्यापक एऩ एम़ जोशी, पर्यवेक्षक बी़ बी़ निकुंभे, ज्येष्ठ शिक्षक आऱ यु़ वसईकर, व्ही़ एस़ बोरकर, आऱ पी़ सूर्यवंशी, एस़ टी़ पाटील उपस्थित होते़
४८ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल राजींदरसिंग, संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी छात्रसैनिकांचे कौतुक केले आहे़
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्या तरी याआधी केलेल्या कामगिरीमुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती़ त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़