किराणा दुकानदारांना माल उतरवण्याची वेळ ठरवून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST2021-05-13T04:36:21+5:302021-05-13T04:36:21+5:30
धुळे : शहरात किराणा दुकानदारांसाठी सकाळी ७ ते ११ ही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ठरवली आहे. या वेळेत मालाचे अनलोडिंग ...

किराणा दुकानदारांना माल उतरवण्याची वेळ ठरवून द्या
धुळे : शहरात किराणा दुकानदारांसाठी सकाळी ७ ते ११ ही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ठरवली आहे. या वेळेत मालाचे अनलोडिंग करणे, ग्राहक करणे शक्य होत नाही. म्हणून माल उतरविण्यासाठी शासनाने वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस ॲण्ड कॉमर्स संघटनेने केली आहे.
शहरात सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान बाजारात खरेदीसाठी लोक येतात. त्यामुळे बाजारात निघाल्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडते. बाजारात फार मोठी गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. म्हणून सकाळी ७ ते ११ या वेळेत ग्राहक आणि त्यांच्या मालाचे लोडिंग करणे तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या मालाचे अनलोडिंग करणे यासाठी दुपारी १२ ते ३ अशी वेळ दिल्यास बाजारात गर्दी निर्माण होणार नाही. दुपारी १२ ते ३ या वेळेत फक्त बाहेरगावाहून आलेल्या मालाची अनलोडिंग व्यापारी बांधव करतील, असे निवेदन असोसिएशन ऑफ बिझनेस ॲण्ड कॉमर्सचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकूळ बधान, सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते यांनी केले आहे.