सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST2021-09-21T04:39:42+5:302021-09-21T04:39:42+5:30
धुळे : मुंबई, साकीनाका येथील घटनेतील पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ...

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ढोल बजाओ आंदोलन
धुळे : मुंबई, साकीनाका येथील घटनेतील पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नुकतेच ढोल बजाओ आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, समाजातील जात पितृसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्री नेहमीच शोषित घटक म्हणून वागवली गेली आहे. तिच्यावर दिवसागणिक अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यातूनच साकीनाका येथील अत्याचाराची घटना घडली असून, सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. या घटनेचा सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जनआंदोलन आणि सत्यशोधक महिला आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा करुन पीडितेला न्याय द्यावा, राज्य महिला आयोगाची कमिटी गठीत करुन जिल्हा पातळीवर आयोग नेमावा, सार्वजनिक ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
या आंदोलनात सिध्दांत बागुल, शरद वेंदे, अमोल शिरसाठ, दीपक बैसाणे, अतुल बैसाणे, रोहिणी जगदेव, मनीष दामोदर, स्वप्नील भालेराव, तुषार सूर्यवंशी, राकेश अहिरे, जितेंद्र अहिरे, प्रसेनजित वाघ, गाैरव भामरे, प्रशांत महाले यांच्यासह सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.