सत्यशोधकतर्फे बोरविहिरला महिला किसान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:28+5:302021-01-20T04:35:28+5:30
निर्मला मोरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर तंट्या भिल सभागृहासमोरील पटांगणात झालेल्या सभेच्या प्रारंभी सामूहिकपणे म. फुले रचित सत्याचा ...

सत्यशोधकतर्फे बोरविहिरला महिला किसान दिन साजरा
निर्मला मोरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर तंट्या भिल सभागृहासमोरील पटांगणात झालेल्या सभेच्या प्रारंभी सामूहिकपणे म. फुले रचित सत्याचा अभंग म्हणण्यात आला. यावेळी कुसुम मोरे, प्रमिला पवार यांची भाषणे झाली. २३ जानेवारी रोजी मुंबई मोर्चासाठी तालुक्यातील ५०० कार्यकर्त्यांची नोंदणी केली असल्याचे ताई टिके यांनी सांगितले. मुंबईतील २६ तारखेपर्यंतचे महापडाव आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सुमन मोरे यांनी व्यक्त केला. दिल्ली आंदोलनात शहाजानपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या रतन सोनवणे-तिखी, सुरेश मोरे, अमोल पवार-गरताड या धुळे तालुक्यातील प्रमुख शेतकरी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक सत्कार यावेळी करण्यात आला. आंदोलनात स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्याशिवाय यश मिळणे शक्य नसल्याचे श्रमिक शेतकरी संघटनेचे सुभाष काकुस्ते यांनी सांगितले़ दिल्ली येथील ५ बॉर्डर शेतकऱ्यांनी बंद केल्या असून २ लाख शेतकरी स्त्री-पुरुष रस्त्यावर आहेत. स्वातंत्र्यानंतरचे हे संख्या, वेळ, लांबी आणि लढण्याची हिंमत यादृष्टीने अभूतपूर्व आंदोलन असल्याचे मत सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले यांनी मांडले.
शिवाजी मोरे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे यानी कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकर घेतला़ याप्रसंगी गरताड ग्रामपंचायतीत नव्याने निवड झालेल्या रत्ना अहिरे, गोमाजी ठाकरे, विमल गायकवाड या सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांचे किशोर ढमाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ सभेला धुळे तालुक्यातील विविध गावांतील ४०० हून अधिक स्त्री-पुरुष उपस्थित होते.