24 तासांच्या प्रयत्नानंतर सतीशचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: April 10, 2017 17:45 IST2017-04-10T17:45:32+5:302017-04-10T17:45:32+5:30
तापीच्या पात्रात बुडालेल्या सतीश छोटू सैंदाने याचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शोधण्यात ग्रामस्थांना यश आले.
24 तासांच्या प्रयत्नानंतर सतीशचा मृतदेह सापडला
शिंदखेडा/ शिरपूर,दि.10 - शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथे तापीच्या पात्रात 50 फूट खड्डयात बुडालेल्या 19 वर्षीय सतीश छोटू सैंदाने याचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करण्यात आले. दुपारी अडीच वाजता मयत संदीपवर अक्कडसे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ग्रामस्थांनी टाकलेल्या मोठय़ा जाळ्याच्या तळाला मयत सतीशचा पाय अडकून मृतदेह वर आला. दरम्यान, या प्रकरणी शिंदखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. शिरपुरला वाळू ठेकेदार गोरख पाटील व हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा त्यांचा पुतण्या यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.