शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी कमी तरीही उत्पन्न सुरू झाल्याचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 22:13 IST

सलून व्यावसायिक : शासनाच्या नियमांचे पालन करुन ग्राहकांना दिली जातेय शिरपूरमध्ये सेवा

शिरपूर : लॉकडाऊनच्या कालावधीत व्यवसाय बंद ठेवल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या सलून व्यावसायिकांना रविवारपासून काहीसा दिलासा मिळाला़ सलून व्यवसाय सुरू झाला असला तरी सुट्टीचा दिवस रविवार असूनही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे़ ग्राहकांची गर्दी कमी असली तरी उत्पन्न सुरू झाल्याचे समाधान सलून व्यावसायिकांमध्ये आहे़लॉकडाऊनच्या तीन टप्प्यांपर्यंत सर्वच व्यवसाय, उद्योग बंदच राहिले़ त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ चौथ्या टप्प्यानंतर काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली होती़ त्यामुळे सलून, ब्युटी पार्लर यांनाही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली़ मात्र, १२ दिवसानंतर पुन्हा या व्यवसायांवर बंदी घालण्यात आली़ त्यामुळे साहजिकच व्यवसायावर परिणाम झाला़ शासनाने सलून, ब्युटीपार्लर यांना काही अटी व शर्तीवर २८ जूनपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली़ त्यानुसार सलून व ब्युटीपार्लर यामध्ये केस कापणे, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग आदी निवडक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे़ त्यामुळे सलून व्यावसायिकांनी २७ जून रोजी आपआपली दुकानांची साफसफाई करून सज्ज केलीत़ मात्र शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे २८ जून ते ४ जुलैपर्यंत दुकाने उघडता आली नाहीत़ त्यामुळे या दुकानदारांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागली़ ५ जुलैपासून सलून दुकाने उघडलीत़ रविवार असूनही अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी दिसत होती़ त्यातच केवळ केस कापण्याची परवानगी देण्यात आल्याने अनेकांनी पाठ फिरविली़ मात्र असे असले तरी लॉकडाऊननंतर इतर व्यवसायांबरोबरच सलून व्यवसायाला परवानगी दिल्याने आर्थिक उत्पन्न सुरू झाल्याचे येथील नाभिक समाज दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र येशी यांनी सांगितले़शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच सलूनमधून सेवा दिली जात आहे़ त्वचेशी संबंधित कोणतीही सेवा दिली जात नसल्याचे येशी यांनी सांगितले़ आजवर बंद असलेला सलून व्यवसाय सुरू झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे़खूप दिवसांनी सलून व्यवसाय सुरू झाल्याचे समाधान आहे़ दुकानातील सर्व वस्तु सॅनिटायझरने साफ करून ठेवण्यात आली आहेत़ फेस शिल्ड, हॅण्डग्लोजचा वापर केला जात आहे़- रामचंद्र येशी, व्यावसायिक

टॅग्स :Dhuleधुळे