दत्तवायपूरचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:54 IST2019-11-19T22:54:20+5:302019-11-19T22:54:42+5:30
२५ हजाराची मागणी, शेतजमिन नावावर करुन देण्याचा मुद्दा

दत्तवायपूरचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात
धुळे : शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी २५ हजाराची लाच स्विकारताना शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सायंकाळी उशिरा रंगेहात पकडले़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़
शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथील एकाची शेतजमिन नावावर करुन घ्यायची होती़ त्यामुळे तक्रारदार हा सरपंच दिलीप पाटील याच्याकडे आला़ संधी साधून शेत जमिन नावावर करुन घेण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी त्याने केली़ तक्रारदार याची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची पडताळणी विभागाकडून करण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा सरपंच दिलीप पाटील याला २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़