जिल्ह्यात आजपासून सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:44+5:302021-02-11T04:37:44+5:30
ग्रामपंचायतीसाठी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने, १५ जानेवारी रोजी १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. १८ जानेवारी ...

जिल्ह्यात आजपासून सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार
ग्रामपंचायतीसाठी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने, १५ जानेवारी रोजी १८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर प्रवर्गनिहाय सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. दरम्यान गेल्या शुक्रवारी प्रशासनातर्फे सरपंच- उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सरपंचपदाची निवड करण्यात येणार आहे.
आज ७५ गावात सरपंच निवड
११ रोजी जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडेल. यात धुळे तालुक्यातील २०, शिंदखेडा २१, साक्री १७ व शिरपूर तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे.
तालुकानिहाय या गावांमध्ये होणार सरपंच निवड
धुळे तालुका- सरवड, मोराणे प्र.नेर, चिंचवार, अजंग-कासविहीर, अजनाळे, अंचाळे, आमदड-वजीरखेडे, आंबोडे, विसरणे, उडाणे, कापडणे, कावठी, कुडाणे (वेल्हाणे), खेडे सुट्रेपाडा, तांडा (कुंडाणे, निमखेडी, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रूक, बांबुर्ले प्र.नेर, गरताड.
शिंदखेडा तालुका- रहिमपुरे, झोतवाडे, अजंदे बुद्रूक, अजंदे खुर्द, अक्कडसे, चौगाव बुद्रूक, चिमठावळ, दलवाडे प्र.न., दरखेडा, दत्ताणे, डाबली, डांगुर्ले-सोंडले,धावडे, हातनूर, हिसपूर, हुंबर्डे-वडली, जसाणे, जातोडा, कामपूर, कर्ले, जुने कोडदे.
साक्री तालुका-फोफादे, भागापूर, दुसाणे, निजामपूर, सातरपाडा, छावडी, दातर्ती, दिघावे, कावठे, मलांजन, वर्धाणे, धवळीविहीर, नवापाडा, झिरणीपाडा, पिंपळगाव खुर्द, हट्टी खुर्द, वेहेरगाव.
शिरपूर तालुका- असली, बलकुवे, कुवे, घोडसगाव, चाकडू, बाळदे, वाठोडे, होळ, हिंगोणी बुद्रूक, उपरपिंड, दहिवद, नटवाडे, कळमसरे, जामन्यापाडा, हिंगोणीपाडा, गरताड, पिंपळे.
सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार
ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून, आता प्रवर्गनिहाय आरक्षणही काढण्यात आलेले आहे. त्यामुळे सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागून आहे. सरपंचपद आपल्याला मिळावे यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावलेली आहे. यात कोणाला यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान सरपंचपदाची निवड झाल्यानंतर लागलीच उपसरपंचपदाची निवड केली जाणार आहे.