धुळे : दोन समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना दुखाविण्याच्या उद्देशाने शांतता धोक्यात आणल्यामुळे गोरक्षक संजय शर्मा यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी संजय शर्मा यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली आहे़ दरम्यान, १ आॅगस्ट रोजी शर्मा यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंदची घोषणा केली होती़रॉकेल पिणारा, जातीय दंगलीचा, बनावट दारु, शस्त्रास्त्रे, अफू, गांजा यासह गो-हत्या करणारा जिल्ह्याची ओळख होऊ लागली आहे़ गोरक्षकांचे प्रयत्न थिटे पडत आहेत़ पोलीस दलाचे सहकार्य मिळत नाही, असा आरोप करीत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गोरक्षक संजय शर्मा यांनी १ आॅगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक दिली होती़ या बंदबाबत पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी मागितलेली नव्हती़ यामुळे पोलीस कर्मचारी चंदू श्यामराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित संजय शर्मा यांच्या विरोधात भादंवि कलम १५३ - अ, २९५ - अ, ५०५ - २ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता़
धुळ्यात गोरक्षक संजय शर्मा यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:23 IST