धुळ्यातील बचत गटाच्या महिलांना सांगलीत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST2021-02-22T04:24:56+5:302021-02-22T04:24:56+5:30
कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व लुपिन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांसाठी चितळे ...

धुळ्यातील बचत गटाच्या महिलांना सांगलीत प्रशिक्षण
कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व लुपिन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांसाठी चितळे डेअरी, सांगली येथे १८-१९ फेब्रुवारीला दोन दिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाला चितळे समूहाचे अध्यक्ष गिरीश चितळे, नाबार्डचे सांगलीचे जिल्हा विकास व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानोरकर, ट्रेनर चंद्रकांत कुलकर्णी, सागर किल्लेदार, वंदना किल्लेदार यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.
शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्यासारख्या नवीन पद्धतीचा वापर, गाई-म्हशी यांच्यासाठी कोरड्या व ओल्या चाऱ्याचे तसेच पिण्यासाठी पाण्याचे नियोजन, जनावरांचा आहारात योग्य बदल, वर्षातून दोन वेळेस जंतू निर्मूलन, जनावरांचा व्यायाम इत्यादी गोष्टींचा वापर कसा केला जातो. त्यातून जनावरे आजारी पडत नाही व दुधाच्या उत्पादनातही चांगली वाढ होते. याविषयी प्रत्यक्ष पाहणीत माहिती देण्यात आली.
चितळे डेअरी व नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. ह्या वेळेस प्रथमच धुळ्यातून महिलांची बॅच ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आली होती.