संगमेश्वर मंदीर पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:02 IST2020-07-25T22:01:47+5:302020-07-25T22:02:06+5:30
संडे अँकर । मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर

dhule
विंचूर ता़ धुळे : बोरी नदीच्या पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून विंचूर येथील संगमेश्वर मंदीर पुराच्या पाण्यात निम्मे बुडाले आहे़
बोरी नदीच्या पर्जन्यक्षेत्रामध्ये शुक्रवारी सायंकाळी तब्बल अडीच तास मुसळधार पाऊस झाला़ शनिवारी देखील पावसाने दमदार हजेरी लावली़ दोन दिवस झालेल्या पावसामुळे बोरी नदीला पूर आला आहे़ त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
बोरी आणि कान्होळी नदीच्या संगमावरील मंदीरांना पुराच्या पाण्याने वेढले आहे़ संगमेश्वर महादेव मंदिरही निम्मेपक्षा अधिक पाण्यात बुडाले आहे़ हे दृश्य पहाण्यासाठी ग्रामस्थ नदीकाठी गर्दी करीत आहेत़
जुन महिन्यात देखील नदीला पूर आला होता़ परंतु त्या तुलनेत शुक्रवार आणि शनिवारी आलेला पूर जास्त होता़ यामुळे शेतकऱ्यांची कामे देखील खोळंबली़ अनेक गावांचा संपर्क तुटल्याने बोरकुंड, दोंदवाड, विंचूर, धामणगाव, बोधगांव, शिरुड, निमगुळ आदी गावांसह बोरी पट्ट्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़
कच्चे रस्ते
गेले वाहून
बोरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गाडरस्त्यांसह इतर कच्च्या रस्त्यांवरील माती, मुरूम, खडीचा भराव वाहून गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत़ यादरम्यान बोरकुंडला खासगी मालकीच्या गाळ्यात पाणी शिरले तर विंचूरला शेळी मृत्यूमुखी पडली़ निमगूळकरांना नदीच्या पलीकडे जाणे अशक्य झाले आहे़