शहरात वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:22+5:302021-06-20T04:24:22+5:30
गटारीचा प्रश्न सुटेना धुळे : येथील मोगलाईतील गवळीवाड्यात गटारीचा प्रश्न गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तसाच आहे. प्रवेशद्वारातच असलेली ...

शहरात वाळू उपसा
गटारीचा प्रश्न सुटेना
धुळे : येथील मोगलाईतील गवळीवाड्यात गटारीचा प्रश्न गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तसाच आहे. प्रवेशद्वारातच असलेली ही गटार सतत तुंबलेली असते. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहते, तसेच परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
पावसामुळे रस्ते बंद
धुळे : पावसामुळे नवीन वसाहतींमधील रस्ते बंद झाले आहेत. डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण झाले नसल्याने रस्त मातीचे आहेत. साधा मुरूमदेखील टाकलेला नाही. त्यामुळे चिखल साचला असून, वाहनांची चाके फसत आहेत.
काटेरी झुडपे काढा
धुळे : शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. विषारी कीटक आणि सर्प आकर्षित होतात. त्यामुळे मैदाने स्वच्छ करावीत.
नियमांचा विसर
धुळे : कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि त्यानंतर अनलाॅक केल्यापासून शहरात गर्दी वाढली आहे. कोरोना नियमांचादेखील अनेकांना विसर पडला आहे. अनेक जण मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढू शकतो.