समाजवादीच्या महिला प्रदेश सचिवांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:28 IST2019-04-28T12:25:57+5:302019-04-28T12:28:11+5:30

शनिवारी रात्रीची घटना : मनपा सभापती युवराज पाटील यांच्यावर आरोप

Samajwadi women's state secretaries have suffered a fatal attack | समाजवादीच्या महिला प्रदेश सचिवांवर प्राणघातक हल्ला

समाजवादीच्या महिला प्रदेश सचिवांवर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीच्या वादातून समाजवादी पार्टीच्या महिला प्रदेश सचिव डॉ़ दिपश्री राजेश नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी महापालिका स्थायी समिती सभापती युवराज चैत्राम पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी डॉ़ दिपश्री यांचे पती डॉ़ बापुराव उत्तमराव पवार यांनी केला आहे़ मारहाणीची घटना अग्रवाल नगर जवळील विशालनगर भागात घडली़ तलवार, बेसबॉलच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे डॉ़ दिपश्री हिच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ घटनेची नोंद अद्यापपावेतो पोलिसात करण्यात आलेली नाही़ युवराज पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा डॉ़ पवार यांनी दिलेला आहे़ 

Web Title: Samajwadi women's state secretaries have suffered a fatal attack