दरमहा दहा तारखेच्या आत वेतन देण्यात येईल; शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST2021-09-18T04:38:50+5:302021-09-18T04:38:50+5:30

धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन ...

Salary will be paid within ten days of each month; The Education Officer assured the office bearers of Shikshan Bharati Sanghatana | दरमहा दहा तारखेच्या आत वेतन देण्यात येईल; शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन

दरमहा दहा तारखेच्या आत वेतन देण्यात येईल; शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आश्वासन

धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून कायम शिक्षणाधिकारी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आता पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे संघटनेतर्फे त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन वेळेवर करावे, शिक्षण विभागाने वरिष्ठ पातळीवर सहा महिन्यांसाठी वेतन आर्थिक निधीची मागणी करणे, शिक्षकांची वैद्यकीय बिले व इतर प्रलंबित बिले तत्काळ मंजूर करणे, पी. एफ.च्या स्लीप मिळणे, संचमान्यता तत्काळ मिळणे, अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडविणे, कोविड काळात कोरोना योद्धा सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागामार्फत कार्यमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अंशतः अनुदानित शाळेचे वेतन नियमित व वेळेवर करण्यात यावे आदी मागण्यांंसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, किरण मासुळे, राजेंद्र पाटील, महिला आघाडी अध्यक्ष अर्पणा पाटील, जयवंत पाटील, रावसाहेब चव्हाण, मुश्ताक शेख, दीपक पाटील, अमोल पाटील, कैलास अमृतकर, आर. पी. खरवंटे, दामोदर पाटील उपस्थित होते.

Web Title: Salary will be paid within ten days of each month; The Education Officer assured the office bearers of Shikshan Bharati Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.