क्षुल्लक कारणावरुन साक्रीत वृध्दाला झोडपले, ६ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:18+5:302021-03-26T04:36:18+5:30
ट्रॅक्टर घेऊन आलेल्या एकाने पाटचारीला लावलेले दगड काढून फेकले. हे दगड का फेकले असे विचारल्याच्या कारणावरुन आलेल्या जमावाकडून हिम्मत ...

क्षुल्लक कारणावरुन साक्रीत वृध्दाला झोडपले, ६ जणांविरुध्द गुन्हा
ट्रॅक्टर घेऊन आलेल्या एकाने पाटचारीला लावलेले दगड काढून फेकले. हे दगड का फेकले असे विचारल्याच्या कारणावरुन आलेल्या जमावाकडून हिम्मत संपत पाटील (६६, रा. दिघावे ता. साक्री) यांच्याशी वाद घालण्यात आला. शाब्दीक चकमकीनंतर शिवीगाळ करीत वेळ हाणामारीपर्यंत येऊन पोहचली. हाताबुक्याने मारहाण करत असताना त्यांची पत्नी वाचविण्यासाठी आली असता तिला ढकलून देण्यात आले. त्याचवेळेस मोबाईल घेण्यासाठी घरात पाटील हे येताच त्यांच्या पाठोपाठ जमावाने घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करीत दमदाटीही केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमी झालेल्या हिंमत पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हिंमत संपत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित बंडू एकनाथ मराठे याच्यासह ६ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.