धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणीला बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली़ टप्प्या-टप्प्याने निकाल बाहेर येत आहेत़ सद्यस्थितीत साक्री तालुक्यातील निजामपूर गटात हर्षवर्धन दहिते भाजपकडून विजयी झाले आहेत़ तर बळसाणे गटात भाजपच्या मंगला सुरेश पाटील विजयी ठरल्या आहेत़ जैताणे गटात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला असून दुसाने गटात अपक्ष उमेदवार पोपटराव सोनवणे यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे़ मतमोजणी सुरु असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे़तसेच शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात काँग्रेस आणि शिरपूर तालुक्यातील सांगवी गटात, गणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांन बाजी मारली आहे़
साक्री तालुक्यात हर्षवर्धन दहिते, पोपटराव सोनवणे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:42 IST