आॅनलाईन कॅट परिक्षेत साक्रीच्या विद्यार्थ्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:54 IST2020-03-13T12:53:55+5:302020-03-13T12:54:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे घेण्यात आलेल्या आॅनलाईन ...

Sakri students' bet on online CAT exam | आॅनलाईन कॅट परिक्षेत साक्रीच्या विद्यार्थ्यांची बाजी

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे घेण्यात आलेल्या आॅनलाईन केमीस्ट्री अ‍ॅबिलिटी टेस्ट अर्थात कॅट या परिक्षेत साक्रीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे़
एकूण ७३९ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती़ त्यात सी़ गो़ पाटील महाविद्यालय साक्री येथील श्रध्दा विकास पाटील, गणेश चौरे, किसान महाविद्यालय पारोळा येथील मोहित विकास निकम, विज्ञान महाविद्यालय धुळे येथील यश अशोक बागुल यांना प्रथम पारितोषिक मिळाले़ तर द्वितीय पारितोषिक सि़ गो़ पाटील महाविद्यायाचा विद्यार्थी चेतन वसंत राठोड आणि तृतीय पारितोषिक त्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी घनशाम धर्मराज हिरे, कला विज्ञान महाविद्यालय नवापूरचा विद्यार्थी योहान नवग्या गावीत यांनी पटकाले़
या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरीत करण्याचा समारंभ घोगरे महाविद्यालयात नुकताच पार पडला़ पुणे येथील युवा उद्योजक डॉ़ एस़ बी़ पाटील यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले़ विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले तर हमखास यश मिळविता येते, असे मार्गदर्शन डॉ़ एस़ बी़ पाटील यांनी केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ़ एम़ व्ही़ पाटील होते़ त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी डॉ़ चेतन पाटील, प्रा़ के़ एम़ बोरसे, डॉ़ आऱ जी़ महाले, डॉ़ प्रियंका शिसोदे, प्रा़ सविता पाटील, डॉ़ एस़ एम़ कोष्टी, डॉ़ प्रशांत पाटील, प्रा़ धिरज बच्छाव, प्रा़ राहुल अवचर आदी उपस्थित होते़

Web Title: Sakri students' bet on online CAT exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे