साक्री आगारप्रमुखांचा इंटकतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:51+5:302021-08-20T04:41:51+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले होते, तर प्रमुख पाहुणे पत्रकार आबा सोनवणे, इंटकचे पोपट ठाकरे, शरद शिंदे, युनूस ...

साक्री आगारप्रमुखांचा इंटकतर्फे सत्कार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले होते, तर प्रमुख पाहुणे पत्रकार आबा सोनवणे, इंटकचे पोपट ठाकरे, शरद शिंदे, युनूस पठाण, वैभव सोनवणे, महेश भदाणे, कमलेश बेडसे, राकेश नेरकर, विठोबा बेडसे, रहुल साळुंके, फरीद पठाण, अनिता डोमसे, मुजगे, कामगार सेनेचे शरद खैरनार, सचिन गाडे, नंदू शिंदे, सागर चव्हाण, माया मोरे आदींची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना आगारप्रमुख किशोर महाजन म्हणाले की, हा माझा सत्कार नसून संपूर्ण आगारातील कामगार कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे. सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे करू शकलो. यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांच्या यशस्वी पाल्यांचाही सत्कार करण्यात आला, तसेच आगारात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चालक, वाहक, तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी आगार व्यवस्थापक इम्रान पठाण, टी.आय. शिंदे, ए.टी.आय. शेख, एडब्लूएस प्रवीण सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव सोनवणे यांनी, तर सूत्रसंचालन दिनेश नेरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिमंत सोनवणे, दीपक चौधरी, कपिल बिलाडे, नंदू शिंदे, शरद खैरनार, भास्कर लोहार, सचिन गाडे, राकेश नेरकर, कमलेश बेडसे, विठोबा बेडसे आदींनी परिश्रम घेतले.