१६ भाषांमध्ये सहजयोग ध्यान प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:54 IST2021-01-02T21:54:07+5:302021-01-02T21:54:32+5:30

नवीन वर्षानिमित्त अनोखा उपक्रम

Sahajayoga meditation training in 16 languages | १६ भाषांमध्ये सहजयोग ध्यान प्रशिक्षण

१६ भाषांमध्ये सहजयोग ध्यान प्रशिक्षण

धुळे : सहजयोग सुवर्णजयंती उत्सवानिमित्त संपूर्ण देशात १६ विविध भारतीय भाषांमध्ये सलग १२ तास ऑनलाइन  कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीचा  कार्यक्रम, निशुल्क प्रशिक्षण रविवारी सकाळी ९  ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक सत्र ४५ मिनिटांचे आहे. 
श्री माताजी निर्मला देवी सहजयोग ट्रस्ट, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट आणि पुणे येथील सहजयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सत्र संस्कृत भाषेमध्ये असेल. त्यानंतर हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, भोजपुरी, आसामी, मराठी, ओडिया, मैथिली, इंग्रजी आणि सिंधी असे एकूण १६ भाषांमध्ये संपूर्ण भारत देशातील साधक www.sahajayoga.org.in या वेबसाइटवर आणि learningsahajayoga या यू-ट्यूब चॅनेलवर सहजयोग ध्यान साधनेचा अनुभव घेऊ शकतील.
या सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे जिल्हा सहजयोग समन्वयक रत्नाकर वसईकर, प्रचार प्रसार प्रमुख सतीश भाटिया, युवाशक्ती समन्वयक सचिन सोनवणे यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात सकाळ-संध्याकाळ ऑनलाइन ध्यानामध्ये शास्त्रीय संगीत व भजन तसेच नवीन साधकांसाठी ध्यान कार्यक्रम व ध्यानामधील गहनता येण्यासाठी नियोजित केलेल्या कार्यशाळेत देश-विदेशांतील लाखो साधकांनी ऑनलाइन सहभागी होऊन ध्यान प्रक्रियेचा लाभ घेतला. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रिसर्च फाउंडेशनद्वारा सहजयोग संस्था सामूहिकतेत ध्यान करून घेणारी, ऑनलाइन मेडिटेशन घेणारी आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था म्हणून गाैरविण्यात आली.
यू-ट्यूब चॅनेलवर दररोज सायंकाळी ५ वाजता मराठी-हिंदी भाषेत सहजयोग प्रशिक्षण हा ६ आठवड्यांचा कोर्स राबविला जातो. सहजयोग ध्यान साधना संपूर्णपणे विनामूल्य आहे.  सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून, दैनंदिन १० मिनिटं ध्यानाने प्रत्येक व्यक्ती  आपल्यामध्ये परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाॅकडाऊन काळात या उपक्रमाचा चांगला लाभ झाला.

Web Title: Sahajayoga meditation training in 16 languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे