स्व.प.दीनदयालजी उपाध्याय यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:58+5:302021-02-12T04:33:58+5:30
भाजपने अंगीकारलेली ‘अंत्योदय योजना’ ही स्व.पं. दीनदयालजी उपाध्याय यांची देणगी आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने देशासाठी तन मन धन अर्पावे, ...

स्व.प.दीनदयालजी उपाध्याय यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील
भाजपने अंगीकारलेली ‘अंत्योदय योजना’ ही स्व.पं. दीनदयालजी उपाध्याय यांची देणगी आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने देशासाठी तन मन धन अर्पावे, जनहितासाठी सत्तेचा वापर व्हावा. भ्रष्टाचारमुक्त शासन असावे हीच नीतीमूल्ये स्वीकारल्यामुळे भारतीय जनता पार्टी केंद्रात व अनेक राज्यात अस्तित्वात आहे. दीनदयालजी यांच्या बलिदानाच्या समर्पणामुळेच आजचा दिवस ‘समर्पण दिवस’ साजरा केला जातो, असे प्रतिपादन नगरसेवक हिरामण गवळी यांनी केले.
या प्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, चंद्रकात गुजराथी, नगरसेवक नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, संतोष खताळ, अमोल धामणे, संदीप बैसाणे, निशा चौबे, अमृता पाटील, अनिल थोरात, विजय पवार, किशोर जाधव, राहुल तारगे, मनोज राघवन, सागर चौधरी, अनिल सोनार, बबनराव चौधरी, प्रथमेश गांधी, विनायक अहिरे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी ‘समर्पण निधी’ संकलित केला.